संत तुकाराम - माझिया संचिताचा ठेवा । ते...

 

माझिया संचिताचा ठेवा । तेणें वाट दाखविली देवा ।

एवढया आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीचें ॥१॥

आळवीन करुणावचनीं । आणिक गोड नलगे मनीं ।

निद्रा आणि जागृति स्वप्नीं । धरिलें ध्यानीं रुप नयनीं ॥२॥

अनाथ भेटी भेटताहे । किंवा नाहीं विचारुनी पाहे ।

लागला झरा अखंडित वाहे । तुका म्हणें हें कळे अंतरीं ॥३॥

comments powered by Disqus