संत तुकाराम - कामें नेलें चित्त नेदी अव...

 

कामें नेलें चित्त नेदी अवलोकूं मुख । फुटों पाहे हें हृदय बहु वाटे दुःख ॥१॥

कां गा सासुरवासी मज केलें भगवंता । आपुली हे सत्ता ते नाहीं स्वाधीन ॥२॥

प्रभातेसी वाटे तुमचे यावें दरुशना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥३॥

येथें अवघे वायां गेले दिसती सायास । तुका म्हणे दिसे झाला वेंचावा नाश ॥४॥

comments powered by Disqus