संत तुकाराम - सांवतामाळी काय तुझा बाप ।...

 

सांवतामाळी काय तुझा बाप । त्याचे उदरीं जालासी गप्प ॥१॥

एकनाथ काय तुझा काका । त्याचे घरीं पाणी वाहसी फुका ॥२॥

जनी कां रे तुझी मावशी । तिच्या संगें तूं राबसी ॥३॥

कबीर काय तुझा मामा । शेले विणुं लागसी पुरुषोत्तमा ॥४॥

तुका म्हणे घेतली आळ । सलगीनें बोल बाळा ॥५॥

comments powered by Disqus