संत तुकाराम - तुजला म्हणती कृपेचा सागर ...

 

तुजला म्हणती कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥

अझुनि कां रे नये तुज माझी दया । काय देवराया पाहतोसी ॥२॥

आळवितों जैसा पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभुकें ॥३॥

प्रेमरस पान्हा पाजीं माझे आई । धांव वो विठाई वोरसोनी ॥४॥

तुका म्हणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥

comments powered by Disqus