संत तुकाराम - सर्व काळ ज्याचें अंतर कुट...

 

सर्व काळ ज्याचें अंतर कुटिळ । त्यानें गळां माळ घालूं नये ॥१॥

सर्व भूती जया नाहीं क्षमा शांति । त्यानें अंगीं विभुती लावूं नये ॥२॥

तुका म्हणे जया न घडे भगवद्भक्ति । तेणें भगवें हातीं धरुं नये ॥३॥

comments powered by Disqus