संत तुकाराम - संत नारी याती जाती । शिंप...

 

संत नारी याती जाती । शिंपल्या पोटीं जन्मे मोतीं ॥१॥

तरि ते कागद कुटून करितां । नाम ठेविलें भगवद्गीता ॥२॥

ताकापासुन लोणी झालें । तरि ते दोन्ही न मिळाले ॥३॥

तुका म्हणे दे गा देवा । जन्म संतां पोटीं व्हावा ॥४॥

comments powered by Disqus