कन्या सासुर्‍याशीं जाये

 

कन्या सासुर्‍यासीं जाये ।
मागें परतोनी पाहे ॥१॥

तैसें जालें माझ्या जीवा
केव्हां भेटसी केशवा ॥२॥

चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥

जीवनावेगळी मासोळी ।
तैसा तुका तळमळी

comments powered by Disqus