बा रे पांडुरंगा केव्हा

 

बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी ।
झालो मी परदेशी तुजविण ॥१॥

ओवाळावी काया चरणावरोनि ।
केव्हा चक्रपाणि भेटशील ॥२॥

तुका ह्मणे माझी पुरवावी आवडी ।
वेगें घाली उडी नारायणा ॥३॥

comments powered by Disqus