मन हा मोगरा अर्पुनी

 

मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा ।
पुनरपी संसारा येणे नाही ॥१॥

मन हे शेवंती देऊ भगवंती ।
पुनरपी संसृती येणे नाही ॥२॥

मन हे तुळशी देऊ हृषिकेशि ।
पुनरपी जन्मा येणे नाही ॥३॥

तुका ह्मणे ऐसा जन्म दिला देवा ।
तुझा वास व्हावा वैकुंठासी ॥४॥

comments powered by Disqus