वेदां मौनपडे श्रुतीसी सां...

 

वेदां मौनपडे श्रुतीसी सांकडें । वर्णितां कुवाडें पुराणासी ॥१॥

मुनीचें जें ध्येय ज्ञानियां निधान । परब्रह्म पूर्ण विटेवरी ॥२॥

पुंडलिकाचे तपें जोडला हा ठेवा । तो हा सकळ देवां मुकुटमणि ॥३॥

तुका म्हणें पायीं राहिलों निवांत । धरुनि हृदयांत हेंचि ध्यान ॥४॥

comments powered by Disqus