भक्तांचा विसांवा । उभा पा...

 

भक्तांचा विसांवा । उभा पाचारितो धांवा ॥१॥

हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें ॥२॥

सुखें भवाब्धि उतरी । कासे लाउनि पैलतीरीं ॥३॥

तुका म्हणें कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥४॥

comments powered by Disqus