नव्हे आधींचे मधीचे । आम्ह...

 

नव्हे आधींचे मधीचे । आम्ही देवाही आधींचे ॥१॥

जेव्हां नव्हतें पवन पाणी । तेव्हां होतों निरंजनीं ॥२॥

जेव्हां नव्हता दुमदुमकार । तेव्हां होतों निर्विकार ॥३॥

जेव्हां नव्हतें चराचर । तेव्हां होतों शून्याकार ॥४॥

जे जे झाले अवतार । तुका त्यांचे बरोबर ॥५॥

comments powered by Disqus