संत तुकाराम - सर्व बहर माझा तुज चालवणें...

 

सर्व बहर माझा तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय आतां ॥१॥

स्वभाव स्वहित हिताचें कारण । कौतुकें करुन निवडिसी ॥२॥

ऐसा सर्व भाव तुज निरोपिला । तूं मज एकला सर्वभावें ॥३॥

अंतरींची कांहीं नेणसील गोष्टी । परि सुखासाठी भुलविसी ॥४॥

तुका म्हणे तूं हें जाणसी गा देवा । आमुच्या स्वभावा अंतरींच्या ॥५॥

comments powered by Disqus