संत तुकाराम - ऐसा देखें मूर्तिमंत । तेव...

 

ऐसा देखें मूर्तिमंत । तेव्हां ध्याय माझें चित्त ॥१॥

मग नव्हें कधीं कष्टी । पायीं ठेवीन मी दृष्टि ॥२॥

ख्याति श्रुति गाती । वेदपुराणें गर्जती ॥३॥

तैसा होईं गा श्रीपती । मज येईल प्रचीती ॥४॥

तुका म्हणे देखें । नीट विटे जें सन्मुखें ॥५॥

comments powered by Disqus