संत तुकाराम - चला वळूं गाई । आतां पाहतो...

 

चला वळूं गाई । आतां पाहतोसी काई ॥१॥

धीर नाहीं माझे पोटीं । झालों वियोगें हिंपुटी ॥२॥

करावें शीतळ । बहु झाली हळहळ ॥३॥

तुका म्हणे डोई । कधीं ठेवीन मी पायीं ॥४॥

comments powered by Disqus