संत तुकाराम - अवघ्या संसाराचा केलासे नि...

 

अवघ्या संसाराचा केलासे निर्वंश । झालों हरिदास आवडीनें ॥१॥

घरीं रांडा पोरें गांजिताती फार । म्हणोनि दारोदार फिरतसें ॥२॥

ठायींचा नपुंसक ठावें माझ्या चित्ता । यावरी लोकांता कळलें असे ॥३॥

काय आमुचें जिणें वाया जावें माये । नायकों तें काय विषयकोडें ॥४॥

तुका म्हणे आतां झालीसी उदासी । नवमास कुशीं वागविलें ॥५॥

comments powered by Disqus