संत तुकाराम - तुझें रुप वेळोवेळां । पडो...

 

तुझें रुप वेळोवेळां । पडो माझ्या दोन्ही डोळां ॥१॥

रामनाम वदो वाणी । हरिकथा पडो कानीं ॥२॥

पायीं तीर्थ यात्रा घडो । देह संतां घरीं पडो ॥३॥

सर्व काळ देवपूजा । नमन माझें गरुडध्वजा ॥४॥

तुका म्हणे देवा । घडो वैष्णवांची सेवा ॥५॥

comments powered by Disqus