संत तुकाराम - ज्याचें सुख त्याला सुख त्...

 

ज्याचें सुख त्याला सुख त्याला । काय अस भलत्याला ॥ध्रु०॥

एक जेवुनि तृप्त झाला । एक हाका मारि अन्नाला ॥१॥

एक नदी उतरुनी गेला । एक हाका मारि तारुला ॥२॥

एक मोक्षमार्गीं गेला । एक अधोगती चालिला ॥३॥

तुका वैकुंठासी गेला । हाका मारितो लोकांला ॥४॥

comments powered by Disqus