राम कृष्ण गोविंद

 

राम कृष्ण गोविंद नारायण हरी ।
केशवा मुरारी पांडुरंगा ॥१॥

लक्ष्मीनिवासा पाहें दीनबंधु ।
तुझा लागो छंदु सदा मज ॥२॥

तुझे नामीं प्रेम देईं अखंडित ।
नेणें तप व्रत दान काही ॥३॥

तुका ह्मणे माझें हेंचि गा मागणें ।
अखंड ही गाणें नाम तुझें ॥४॥

comments powered by Disqus